दिव्यांग व्यक्तींना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या या हेतूने महाराष्ट्र राज्यस्तरावरील दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून *ई-वाहन (म्हणजेच तीन चाकी टेम्पो) मोफत मिळणार आहे.*
*प्रमुख अटी*
१. ४० टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेली व्यक्ती (स्त्री व पुरुष)
२. वय वर्षे १८ ते ५५ या दरम्यान असावे.
*लागणारी कागदपत्रे*
१. अर्जदाराचा फोटो
२. अर्जदाराची स्कॅन केलेली सही
३. अधिवास प्रमाणपत्र (डोमेसाईल प्रमाणपत्र नसल्यास जवळच्या तहसील कार्यालयातून हे घेऊ शकता, त्यासाठी १५ दिवस लागतात)
४. निवासाचा पुरावा (आधार कार्ड, वीज बिल इ.)
५. ओळखीचा पुरावा (पॅनकार्ड, मतदान कार्ड इ.)
६. दिव्यांग प्रमाणपत्र (नवीन वाले)
७. UDID दिव्यांग कार्ड
८. अर्जदाराचा बँक पासबुक
९. अर्जदाराचे प्रतिज्ञापत्र (फॉर्म भरताना नमुना दिसेल, तो प्रिंट करून भरून अपलोड करावा)
१०. अर्जदार आरक्षित प्रवर्गातील असल्यास जातीचा दाखला जोडावा, अन्यथा अर्जदाराने खुल्या गटातून अर्ज करावा.
*अर्ज कसा करावा?*
अर्जदाराने https://evehicleform.mshfdc.co.in/login ह्या वेबसाईटवर जाऊन अर्ज भरावा. अर्ज भरण्यास एकदम सोप्पा आहे. मोबाईल वरून किंवा घरातूनसुद्धा तुम्ही अर्ज भरू शकता.
*अर्ज करण्याचा कालावधी*
सदरील अर्ज तुम्ही ३ डिसेंबर २०२३ ते ४ जानेवारी २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने भरू शकता.
काही अडचण आल्यास जवळच्या सामाजिक सुरक्षा मार्गदर्शन महाराष्ट्र शासन महा ई सेवा केंद्राची मदत घ्या.
--------